p>

खेडीजवळ स्कूल बसवर ट्रक धडकला : तीन विद्यार्थी जखमी


जळगाव : भरधाव ट्रकने विद्यार्थी वाहतूक करणार्‍या स्कूल बसला धडक दिल्याने तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना खेडीजवळ शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जखमी विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा
जळगाव शहरातील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूची बस (क्रमांक एम.एच. 19, वाय. 6005) विद्यार्थी घेवून खेडीजवळून जात असताना त्याचवेळी भुसावळकडून जळगावकडे येणार्‍या भरधाव ट्रकने (क्रमांक एम.एच. 46, एफ. 0121) बसला चालकाच्या बाजूने धडक दिली. या अपघातात बसमधील विद्यार्थी आरुष तुषार कोळी, गौरजा विश्वनाथ खडके व विराट सुयोग चोपडे यांना किरकोळ जखमा झाल्या. जळगाव एमआयडीसी पोलिसांनी ट्रक आणि अपघातग्रस्त स्कूल बस ताब्यात घेतली. ट्रक चालक गणेश विष्णू पाटील (रा. कर्की ता. मुक्ताईनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.