अॅपेने उडवल्याने नाडगावच्या प्रौढाचा मृत्यू
नाडगाव-बोदवड रस्त्यावरील दुर्घटना
बोदवड- भरधाव अॅपेने धडक दिल्याने शौचाला जाणार्या नाडगावच्या 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास नाडगाव-बोदवड रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ घडली. या अपघातात अरुण सीताराम अवचारे यांचा मृत्यू झाला. बोदवडकडून मुक्ताईनगरकडे जाणारी अॅपे (क्र.एम.एच. 19- बी.एम.0892) ने अवचारे यांना धडक देताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अॅप चालक योगेश सुभाष माळी (वय 42, रा. आनंदनगर, बोदवड) विरुद्ध बोदवड पोलिसात गुन्हा दाखल झाला.