भरधाव ट्रकची दुचाकीला धडक : तिघे ठार


मयत बडवानी जिल्ह्यातील रहिवासी : ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील विंचूर गावाजवळ रविवारी सायंकाळी घडली. पेवा नानला चौहाण (28), श्यामलाल बरकत खरते (30, दोन्ही रा.शिवन्या, ता.सेंधवा, जि.बडवानी) व कानसिंग कसा रावत (19, रा़ भामपुरा, ता़ सेंधवा, जि.बडवानी) अशी मयतांची नावे आहेत.

जागीच तिघांचा मृत्यू
चाळीसगावहून धुळेमार्गे सेंधवाकडे दुचाकी (एम.पी. 46 एम.बी. 8972) तीन युवक निघाले असता तालुक्यातील विंचूर गावाजवळ चाळीसगावच्या दिशेने जाणारा ट्रक (टी.एन.18 ए.पी. 7920) ने जोरदार धडक दिल्याने तीन्ही युवकांचा मृत्यू झाला. विंचूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, तालुका पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे आणि धुळे तालुका पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !