बैलांनी शर्यत जिंकली : बैल मालकाला मिळाली चक्क विमान तिकीटे


साकेगावात पोळा सण उत्साहात : दोन ठिकाणी फुटला पोळा

साकेगाव- सालाबादाप्रमणे गावात दोन ठिकाणी पोळा फोडण्यात आला. समाधान कोळी व पंकज कोळी या युवकांनी गांधी चौक व जिल्हा परिषद शाळा मैदान अशा दोघी ठिकाणी बैलांच्या शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावल्याने या दोघा युवकांना टू जेट एअरलाइनतर्फे दोन जळगाव ते मुंबई विमान तिकीटेत बक्षीस वितरण कार्यक्रमात भेट देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी तालुका पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक गजानन करेवाड, सरपंच अनिल पाटील माजी सरपंच आनंद ठाकरे, सुरेश पाटील, पोलीस पाटील राजू सपकाळे, ट्रू जेट एअरलाइनचे संचालक निमेश जोशी, ग्रामपंचायत सदस्य अनिल सोनवाल, गजानन कोळी, राजेंद्र बाबुराव, राज इंटरनॅशनल टुरीझमचे संचालक अभिरत पाटील, आबा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच, ग्रामपंचायत कमिटी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी बंदोबस्त राखला.


कॉपी करू नका.