बोदवडमध्ये दुकाने फोडणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात


बोदवड : शहरातील धान्य दुकानासह मोबाईल शॉपी फोडल्याची घटना 7 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पाच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेंड्या उर्फ किसन कैलास सोनवणे (24), गणेश काशीनाथ पवार (28), शुभम प्रभाकर वाघ (21), वसंता अशोक सोनवणे (32, सर्व रा.भिलवाडा, बोदवड) अशी अटकेतील आरोपींची नावे असून ईश्वर उर्फ झिट्या अनिल पिंपळे (बुलढाणा) यास बुलढाणा येथून अटक करण्यात आली. दरम्यान, दोन आरोपी पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक भाईदास मालचे, गोपाल गव्हाळ, संदीप वानखेडे, कालिचरण बिर्‍हाडे, मनोज पाटील, चौधरी, महाले यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !