राज्य उत्पादन शुल्क विभागाचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात


परमीटरूम नूतनीकरण मोबदल्यासह कारवाई न करण्यासाठी मागितली 13 हजारांची लाच

धुळे : परमीट रूम बियर बारचे नूतनीकरण करण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदला आठ हजार रुपये तसेच परमी रूमवर कोणतीही कारवाई न होऊ देण्यासाठी अडीच हजारांप्रमाणे गत दोन महिन्यांच्या हप्त्याचे पाच हजार रुपये मिळून एकूण 13 हजार लाचेची मागणी करणार्‍या धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील शिपाई अमोल सुधाकर धनगर (35, रा.प्लॉट नं.43, प्रभात नगर, देवपूर, धुळे) यास लाच घेताना धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवारी अटक केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

अन सापळ्यात अडकला शिपाई
धुळ्यातील 55 वर्षीय तक्रारदाराचा परमीटरूम बार असून त्याचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर सहकार्याच्या मोबदल्यात तसेच दोन महिन्यांच्या हप्त्यांपोटी एकूण पाच हजार व असे मिळून 13 हजारांची लाच 10 रोजी आरोपी मागितल्याने एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मनजीतसिंग चव्हाण, संदीप सरग, भूषण खलाणेकर, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, भुषण शेटे, हवालदार जयंत साळवे, संतोष हिरे, संदीप कदम, प्रकाश सोनार आदींनी गुरुवारी आरोपीला लाच घेताच अटक केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !