भुसावळात नूतन मुख्याधिकारी संदीप चिद्रवारांनी पदभार स्वीकारला


भुसावळ : भुसावळ पालिकेचे नूतन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी गुरुवारी सकाळी भुसावळ पालिकेचा पदभार स्वीकारला. गेल्या काही महिन्यांपासून पालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने शहर विकासाच्या कामांना ब्रेक लागला होता मात्र पूर्ण वेळ मुख्याधिकार्‍यांमुळे शहराच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. महादूला नगरपंचायतीतून परीविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून चिद्रवार बदलून आले आहेत.

पदाधिकार्‍यांनी केले स्वागत
गुरुवारी नूतन मुख्याधिकार्‍यांचे कृउबा सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक उल्हास पगारे, दुर्गेश ठाकूर तसेच भाजपा नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, सतीश सपकाळे आदींनी स्वागत केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !