धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 574 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 16 हजार 536 वर : 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी पुन्हा 574 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 16 हजार 536 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 11 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 638 झाली आहे. दरम्यान, एकाच दिवसात जळगाव शहरात 168 रुग्ण आढळले आहेत.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 168
जळगाव ग्रामीण 24
भुसावळ 22
अमळनेर 89
चोपडा 64
पाचोरा 25
भडगाव 09
धरणगाव 32
यावल 23
एरंडोल 04
जामनेर 31
रावेर 14
पारोळा 39
चाळीसगाव 21
मुक्ताईनगर 03
बोदवड 01
अन्य जिल्हा 05

