रावेरात उद्या स्वातंत्र्य सैनिकांचा होणार सन्मान


रावेर : 15 ऑगस्ट रोजी झूम अ‍ॅपद्वारे तहसीलदार उषाराणी देवगुणे रावेर तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांशी संवाद साधणार असून ध्वजारोहणच्या कार्यक्रमात झूम अ‍ॅपवरुन त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून रावेर तालुक्यातील 46 वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकांशी येणार्‍या 15 ऑगस्ट रोजी तहसीलदार उषाराणी देवगुणे संवाद साधतील तसेच त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासन तर्फे देण्यात आली आहे. तालुक्यातील खिरोदा प्र.यावल येथील 28 स्वातंत्र्य सैनिक असून चिनावल येथील तीन, पाल येथील दोन, सावखेडा, उटखेडा, मुंजलवाडी, मोरगाव, दसनुर, वाघोड, सिंगनुर, निंभोरा, ख़िर्डी,मस्कावद,कळमोदा येथील प्रत्येकी एक असे एकूण 44 स्वातंत्र्य सैनिक तालुक्यात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !