अखेर मेहरुण तलावात बुडालेल्या ‘त्या’ तरूणाचा मृतदेह सापडला
जळगाव : काम संपवून मित्रांसोबत मेहरूण तलावावर फिरायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडल्यानंतर शुक्रवारी तिसर्या दिवशी तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. साईनाथ शिवाजी गोपाळ (22, रा.धामणगाव वाडा, समता नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. बुधवार, 12 ऑगस्ट रोजी साईनाथ याने दुपारी काम संपवुन पिंप्राळा रेल्वे गेट जवळूनच तो, त्याचा नातेवाईक ज्ञानेश्वर अर्जुन गोपाळ आणि मित्र सोनू सुरेश गोपाळ अशांसोबत निघाला होता. अजिंठा चौकातून तिघांनी मेहरुण तलावावर जाण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने सोनू गोपाळ देाघांना सोडून तेथुन निघुन गेला हेाता. येथे बराच वेळ टाईमपास केल्यानंतर साईनाथ व ज्ञानेश्वर अशा देाघांनी बराच वेळ तलावात पोहण्याचा आनंद घेतला. संध्याकाळपुर्वीच ज्ञानेश्वरने त्याला घरी जाण्यासाठी हट्ट करीत होता. मात्र, हातपाय आणि अंगातील कपडे मळकट झाल्याचे सांगत साईनाथ तलावातील कपडे धुण्याच्या काठावर आला. नंतर तो बेपत्ता झाला.
कुटूंबीयांची शेाधा शोध
रात्री उशिरापर्यंत साईनाथ घरी परतला नाही म्हणुन त्याचा भाऊ राकेश व कुटूंबीयांनी शोध सुरु केला. तर, तिघे मित्र मेहरुण तलावावर गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथेही शोध घेतला. तलाव काठावर त्याचे कपडे मिळून आल्यानंतर कुटूंबीय पेालिस ठाण्यात धडकले. रात्रीच सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील अशांनी मेहरुण तलाव गाठले. मात्र, अंधार असल्याने उपयोग होणार नाही म्हणून पोहहणार्यांनी तलावात जाण्यास नकार दिला. दिवस उजाडल्या नंतर सकाळपासून पट्टीचे पोहणारे तलावात उतरवुन साईनाथ गोपाळ याचा शोध सुरु होता मात्र दुपारपर्यंतही त्याचा शोध न लागल्याने अखेर आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. उपनिरीक्षक विशाल सोनवणे, अतुल वंजारी, आसीम तडवी यांच्यासह पथक बोटीद्वारे पहाणी करुन पाहेणार्यांना तलावाच्या तळाशी शोध घेण्याचे काम सुरु होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्यासुमारास मयत साईनाथचा मृतदेह पाण्यात आढळून आला.

