मेहुरुण शिवारात 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या
जळगाव : झाडाला दोरीने गळफास घेत 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना मेहरुण शिवारात एका शनिवारी सकाळी उघडकीस आली. कुणाल मैकूलाल पाली (वय 28, रा.यवतमाळ, ह.मु.मेहरुण) असे मयताचे नाव आहे. मेहरुणमधील शेतकरी विशाल नामदेव नाईक यांच्या शेतात वाचमन म्हणून कुणाल काम करीत होता. पंचनामा करुन शेतमालक नाईक यांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला असता वैद्यकीय अधिकारी नीता भोळे यांनी कुणालला मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान अविवाहित असलेल्या कुणालने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

