अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ऑनलाईन गणेश शाडू मुर्ती कार्यशाळा.


‘शाडूमातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करुया’

भुसावळ : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती आणि इतर सजावटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण पुरक गणेशमूर्ती घरी तयार करून त्याच मूर्तीची स्थापना करावी या उद्देशाने अंतर्नादने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा मंगळवार, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता अंतर्नादच्या फेसबुक पेजवर आणि झूम अ‍ॅपवर ऑनलाईन होणार आहे. प्रशिक्षक म्हणून रमाकांत भालेराव असतील. उत्कृष्ट मूर्ती बनवणार्‍या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या पाच व्यक्तिंना रोख रक्कम, प्रमाणपत्र व व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे. 21 ऑगस्ट 2020 पर्यंत मूर्ती बनवतांनाचा एक आणि रंगवून झाल्यानंतर एक असे दोन फोटो, नाव, वय आणि शहराचच्या नावासह 9421741824 या क्रमांकाच्या व्हॉटसअ‍ॅपवर पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या लाईव्ह कार्यशाळेत सहभागी होवू इच्छिणार्‍यानी वेळेपूर्वीच शाळू माती भिजवून तयार ठेवावयाची असल्याचेही कळवण्यात आले आहे.

यांचे उपक्रमासाठी परीश्रम
या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख म्हणून ज्ञानेश्वर घुले तर प्रकल्प समन्वयक म्हणून प्रमोद पाटील, आणि प्रकल्प सह समन्वयक म्हणून सचिन पाटील हे असणार आहे. या उपक्रमाच्या समितीत सदस्य म्हणून योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, जीवन महाजन, देव सरकटे, जीवन सपकाळे, विक्रांत चौधरी, हरीष कोल्हे, मिलिंद कोल्हे, अमित चौधरी, समाधान जाधव, संदीप सपकाळे, राजू वारके हे असणार आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक गणेशोत्सव म्हणून साजरा करण्याच्या उद्देशाने जास्तीत जास्त लोकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !