भुसावळात पालकमंत्र्यांची ‘एकच प्याला टी पॉइंटला’ सदिच्छा भेट


भुसावळ : शहरातील आठवडे बाजार परीसरातील एकच प्याला अमृततुल्य टी पॉइंटला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन स्वादीष्ट चहाचा आस्वाद घेतला. भुसावळचे ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांनी अलीकडेच एकच प्याला अमृततुल्य टी पॉइंट सुरू केले असून अल्पावधीत त्याला ग्राहकांची पसंती मिळाली आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे भुसावळ येथे आले असता त्यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या सोबत नगरसेवक मनोज बियाणी, महेंद्रसिंग ठाकूर, राजू पारख, नितीन जैन, ओंकारसिंग चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी दुकानाला दिलेली भेट ही अविस्मरणीय असल्याचे संजयसिंग चव्हाण म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !