जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 287 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 18 हजार 584 वर : आतापर्यंत 671 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी तब्बल 287 कोरोनाबाधीत रुग्ण आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 18 हजार 584 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 09 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून कोरोनामुळे आतापर्यंत 671 रुग्णांचे मृत्यू ओढवले आहेत. एकूण बाधीतांपैकी 12 हजार 774 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सोमवारी 330 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे सूत्रांनी सांगितले.

या शहरात आढळले कोरोनाबाधीत
जळगाव शहर 64
जळगाव ग्रामीण 15
भुसावळ 04
अमळनेर 19
चोपडा 50
पाचोरा 04
भडगाव 13
धरणगाव 11
यावल 15
एरंडोल 07
जामनेर 12
रावेर 04
पारोळा 21
चाळीसगाव 24
मुक्ताईनगर 17
बोदवड 06
अन्य जिल्हा 01



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !