अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर मार्गाच्या दुरवस्थेने वाहनधारक संतप्त


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आश्‍चर्य व संतापही

यावल : शहरातून जाणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर मार्गावरील रस्त्यावर गेल्या चार महिन्यांपासून ठिकठीकाणी मोठ-मोठे खड्डे पडल्याने शिवाय या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागता आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत असून अप्रिय घटना घडण्यापूर्वीच दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सा.बां.विभागाच्या भूमिकेमुळे संताप
यावल शहरातून जाणार्‍या व वाहनांसह पादचार्‍यांची नेहमीच मोठी वर्दळ असणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर या राज्य मार्गावरील भुसावळ टी पॉईंट ते बुरुज चौक ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर मध्यभागी ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यातच पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकाला खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. या माार्गवरून दुचाकी वाहनांसह अवजड वाहनांची व पादचार्‍यांची मोठी वर्दळ असते त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना या मार्गाने जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळी वाहनाचे अपघात देखील होतांना दिसत आहे. यात विशेष म्हणजे यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय याच मार्गावर असतानाही या विभागाच्या अधिकार्‍यांकडून डोळेझाक होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे नागरीकांसह वाहनधारकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !