वाघझिर्‍यात वन कर्मचार्‍यांची वाहने पेटवली


दोन लाख 35 हजारांचे नुकसान : गुन्हा नोंदवल्याचा रागातून कृत्य

यावल : गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या रागातून सात संशयीतांनी वाघझिरा येथील वन कर्मचार्‍यांच्या दोन दुचाकींना पेटवून दिल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत दोन लाख35 हजार रुपयांचे नुकसान झाले.

वाहनांसोबत दरवाजाही पेटला
वाघझिरा येथे वनविभागाच्या पश्चिम वनक्षेत्रातील कर्मचार्‍यांची निवासस्थाने आहेत. शनिवारी रात्री वनकर्मचारी संदीप पंडीत यांची दुचाकी (क्रमांक एम. एच. 22 ए. एफ.5483) व राजेश निकुंभे यांची बुलेट (दुचाकी क्रमांक एम.एच. 39 ए. ई. 7355) त्यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर लावल्या होत्या. मध्यरात्री वाघझिरा गावातील ईश्वर लकड्या बारेला, गज्या हरसिंग बारेला, लकड्या चैनसिंग बारेला, भगवान चैनसिंग बारेला, शरीफ अकबर तडवी, चंदन बुटासिंग बारेला व शाकिर कुर्बान तडवी या सात संशयितांनी दुचाकी पेटवल्या. शासकीय निवासस्थानाच्या दरवाजाचेही घटनेत नुकसान झाले. दरम्यान, वन कर्मचार्‍यांनी 18 मे रोजी सातपुड्यात सागवान तस्कीराला विरोध करत, काही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच रागातून या सर्वांनी हे कृत्य केल्याचा दाट संशय आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !