रावेरात गॅस ग्राहकांना सबसीडीची प्रतीक्षा


रावेर तालुक्यातील 32 हजार 900 ग्राहकांना चार महिन्यांपासून सबसीडी मिळालीच नाही

रावेर : भारत गॅस कंपनीच्या तब्बल 32 हजार 900 ग्राहकांना गेल्या चार महिन्यांपासून शासनाकडून सबसीडी न मिळाल्याने त्यांच्यात तीव्र नाराजीची भावना आहे. आधीच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातातील रोजगार हिरावला गेल्याने दुहेरी संकट झेलावे लागत असतानाच शासनाकडून सबसीडी मिळत नसल्याने गॅस ग्राहकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. लॉकडाउन लागल्या नंतर शासनाने मे महिन्यापासून ग्राहकांना मिळणारी सबसीडी काहीही कारण नसतांना बंद करण्यात आली आहे.

गृहिणी अधिक संतप्त
धुरमुक्त कुटुंब करण्याचा संकल्प व्यक्त करीत शासनाकडू गाजा-वाजा करीत गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले मात्र आधीच महागाईचा आगडोंब उसळत असतानाच कोरोना महामारीचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊनही वाढल्याने सर्वसामान्यांना जगणे कठीण ठरू पाहत आहे. त्यातच सर्वसाधारण कुटुंबांना चार महिन्यांपासून गॅस सिलिंडरपोटी शासनाकडून मिळणार सबसीडी भेटत नसल्याने गृहिणींमधूनही या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
रावेर परीसरातील ग्राहकांना शेवटची सबसिडी एप्रिल महिन्यात मिळाली होती व त्यावेळी 744 रुपये किंमत असलेल्या गॅस सिलेंडरवर शासनाकडून 160 रुपये सबसीडी गॅस ग्राहकांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली मात्र त्यानंतर आलेल्या मे, एप्रिल, जून, जुलै महिन्याची सबसीडी शासनाने ग्राहकांना दिली नसल्याने त्यांच्यात नाराजीची भावना आहे.

सबसीडीपासून 32 हजार 900 ग्राहक वंचित
रावेर परीसरात भारत गॅसचे 32 हजार 900 ग्राहक आहे. त्यांना मागील मे, एप्रिल, जून, जूलै महिन्याची हक्काची मिळणारी सबसिडी मिळाली नाही. सद्या स्थिती एका गॅस सिलेंडरची किंमत 599 इतकी आहे. रेगुलर गॅस कनेक्शन धारकांना सबसिडी न मिळाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

उज्वला योजनेच्या ग्राहकांना मोफत सिलिंडर
उज्वला ग्राहकांची संख्या चार हजार 900 इतकी आहे तर कोरोना काळात या योजनेच्या लाभार्थींना शासनाकडून एप्रिल मे आणि जून महिन्याचे सिलेंडर मोफत मिळाले आहे. प्रत्येक महिन्याला एक तसेच पुढचे सिलेंडर न भरल्यास त्यांना सुध्दा पुढचे फ्री चे सिलेंडर देण्यात येऊ नये, असे गॅस एजन्सीला शासनाचे आदेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सबसीडीचा विषय हा शासनाचा
सबसीडीचा विषय हा शासनाचा असून आमची केवळ सिलेंडर पुरवठा करण्याची जबाबदारी आहे. गेल्या चार महिन्यांपासुन रेगुलर गॅस कनेक्शनची सबसीडी ग्राहकांना त्यांच्या बॅक खात्यावर वर्ग झाली नसल्याचे भारत गॅसचे व्यवस्थापक सुनील महाजन म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !