युरीयासह दांडी बहाद्दर अधिकार्‍यांवरून गाजली रावेरात आढावा बैठक


रावेर : युरीया रासायनिक खतांच्या विषयासह दांडी बहाद्दर अधिकार्‍यांवरून रावेर पंचायत समितीची मासिक आढावा बैठक चांगलीच गाजली. प्रत्येक बैठकीला अनुपस्थित राहणार्‍या अधिकार्‍यांमुळे सभापती जितेंद्र पाटील चांगलेच संतापले व त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पंचायत समिती सदस्य दीपक पाटील यांनी यूरीयाचा विषय काढत शेतकर्‍यांना कृषी दुकानदार संमिश्र खते घेण्यासाठी बंधने आणताय, असे होता कामे नये व तसे झाल्यास कृषी केंद्रावर कारवाई करण्याचे त्यांची दोन्ही कृषी विभागाला सुनावले. यावेळी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील जुम्मा तडवी, प्रतिभा बोरवेले, योगीता वानखेडे बैठकीला उपस्थित होत्या.

उपसभापतींसह सदस्यांच्या बैठकीला दांड्या
रावेर पंचायत समितीच्या महत्वाच्या मासिक बैठकीला उपसभापती पी.के.महाजन, पंचायत समिती सदस्य धनश्री सावळे, माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, कविता कोळी या सदस्यांनी दांड्या मारल्याचे दिसून आले.

बीडीओंच्या पहिल्याच बैठकीला अधिकार्‍यांच्या दांड्या
मासिक बैठकीला सभापती तसेच पंचायत समिती सदस्य तक्रारींचा पाऊस पाडत असतांना पूर्ण बैठकीत बीडीओ दीपाली कोतवाल मौन होत्या. उलट त्यांच्या पहिल्याच बैठकीला वीजपुरवठा, बस वाहतूक, पुर्नवर्सन विभाग, सार्वजनिक बांधकाम, बाल विकास प्रकल्प, शालेय पोषण आहार विभागाच्या अधिकार्‍यांनी बीडीओ दीपाली कोतवाल यांच्या पहिल्याच बैठकीला दांड्या मारल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !