भुसावळातील अल्पवयीन चोरट्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त


भुसावळ : खामगावसह कल्याण येथून चोरलेल्या दुचाकी भुसावळातील मुस्लीम कॉलनीतील अल्पवयीन इराणी चोरट्याने चोरल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयीतास सीआरपीसी 41 (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. खामगाव येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 70 हजार रुपये कमतीची तर खडकपाडा कल्याण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून 80 हजार रुपये किंमतीची चोरलेली दुचाकी अल्पवयीन संशयीताच्या ताब्यातून जप्त करण्यात आली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, हवालदार शरीफोद्दीन काझी, सुरज पाटील, नाईक युनूस शेख, नाईक किशोर राठोड, नाईक अरुण राजपूत व रणजीत जाधव यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !