भुसावळ लोहमार्गच्या 12 कर्मचार्‍यांना पदोन्नती


स्वातंत्र्यदिनी निरीक्षकांनी स्टार लावून वाढवले कर्मचार्‍यांचे मनोबल

भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यातील तब्बल 12 कर्मचार्‍यांनी पदोन्नती मिळाली आहे. स्वातंत्र्यदिनी पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी कर्मचार्‍यांना स्टार व फित लावून त्यांचे मनोबल वाढवले. हवालदारसह नाईक व कॉन्स्टेबल यांना अनुक्रमे सहाय्यक फौजदार, हवालदार व नाईक म्हणून या कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळाली आहे.

नवीन पदासह पदोन्नतीप्राप्त कर्मचारी असे
सहाय्यक फौजदार राजेश पुराणिक, पोलिस हवालदार शैलेंद्र पाटील, हवालदार गोपाळकृष्ण सोनवणे, हवालदार शिवलाल दहिकर, हवालदार दिवाणसिंग राजपूत, हवालदार भरत पवार, हवालदार तुळशीराम अंभोरे, हवालदार श्रीकृष्ण निकम, नाईक समाधान कंखरे, नाईक योगेश चौधरी, नाईक विजय यादव, नाईक योगेश अडकणे या कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळाल्याचे लोहमार्ग पोलिसांच्या सूत्रांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !