भुसावळातील जामनेर रोडवरील ड्रेनेजचा प्रश्न सोडवणार
नूतन मुख्याधिकार्यांनी केली पाहणी : पालिकेने काम न केल्यास स्वखर्चातून करणार दुरुस्ती : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील ड्रेनेजचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी भेट देऊन पाहणी केली. हा प्रश्न येत्या आठवडाभरात सोडवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. शहरातील जामनेर रोडवरील स्व. मोटूमल चांदवाणी चौकातील ड्रेनेनचा प्रश्न गंभीर बनला आहे. नितीन धांडे यांच्या तक्रारीवरून काही दिवसांपुर्वी पालिकेने ड्रेनेजचे काम हाती घेतले होते. मात्र ते काम पुन्हा थांबले. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. याप्रकरणी धांडे यांनी भोपळा विसर्जन आंदोलनही केले होते. तरीदेखील पालिकेने दुर्लक्ष केले. आता नवीन सीओंनी ही समस्या सोडवण्याची ग्वाही दिली आहे. नागरीकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. याप्रकरणी धांडे यांनी भोपळा विसर्जन आंदोलनही केले होते. तरीदेखील पालिकेने दुर्लक्ष केले. आता नवीन सीओंनी ही समस्या सोडवण्याची ग्वाही दिली असलीतरी पालिकेने काम न केल्यास स्वखर्चातून आपण हे करू, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे म्हणाले.

