रावेरात मोबाईल व्हॅनमध्ये होणार अँटीजन टेस्ट


रावेर : शहरात कोरोना टेस्ट करणार्‍या मोबाईल व्हॅनचा नगरपालिकेतर्फे शुभारंभ करण्यात आला असून या व्हॅनमध्ये नियुक्त डॉक्टरांची टिमकडून अँटीजन टेस्टद्वारे नागरीकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. रावेर शहरातील प्रत्येक व्यापारी, हातगाडी, भाजीवाले, चालक, वृत्त पेपर विक्रेते यांच्यासह महिला, पुरूष व वयोवृध्द व्यक्तींची कोरोना चाचणी केली जात असून आपल्या दारी आलेला व्हॅनचा लाभ घेण्याचे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी केले आहे.

शंभर नागरीकांची तपासणी
शहरातील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरपालिकेतर्फे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर भर दिला जात असून त्यासाठी कोरोना टेस्ट मोबाईल व्हॅन निर्माण करण्यात आली आहे. याद्वारे कोरोना चाचणीला नगरपालिकेतर्फे सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी अवघ्या दीड तासात एकूण 100 नागरीकांनी स्वतःहून कोरोना तपासणी करून घेतली. दररोज शहराच्या विविध भागात तपासणी करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी गत आठवड्यात नगरपालिकेतर्फे शिवाजी चौक, मराठा मंगल कार्यालय, पोलिस स्टेशन, अग्निशामक दलाचे कार्यालय, आदित्य इंग्लिश स्कूल या ठिकाणी तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यावेळी 100 नागरीकांची तपासणी केली असा तीन जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. कोरोनाच्या तपासणीसाठी कोरोना टेस्ट मोबाईल व्हॅन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी येथील बसस्थानकाजवळ या व्हॅनद्वारे शिबिर घेण्यात आले. यावेळी 100 जणांची तपासणी केली असता सर्व अहवाल निगेटीव्ह आले. शिबिराला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी भेट दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !