मोहरम सण साध्या पद्धतीने साजरा करावा
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांचे आवाहन
रावेर : कोरोनाचा पादुर्भाव लक्षात घेता येणारा मोहरम सण साध्या पध्दतीने साजरा करावा तसेच कायदा-सुव्यस्थेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी केले. मंगळवारी रावेर पोलिस स्टेशनच्या आवारात आगामी मोहरम सणानिमित्त बैठक घेण्यात आली. यावेळी पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी मोहरम सण आणि कोरोना महामारीत सोशल डिस्टेंसिंग ठेऊन साध्या पध्दतीने साजरा करावा, महाराष्ट्र सरकार तसेच जिल्हाधिकारी यांच्या निर्देश व सुचना प्रमाणे सर्व प्रकारचे मोहरमसह अन्य सण उत्सव साद्या पध्दतीने साजरे करावे तसेच मोहरम मिरवणूक काढू नये, असे आवाहन निरीक्षक वाकोडे यांनी केले आहे. बैठकीला सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांच्यासह राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, यूसुफ खान, गयास शेख यांच्यासह सर्व मुस्लिम पंच कमेटी सदस्य मौलाना उपस्थित होते.

