पत्नीशी अनैसर्गिक कृत्य : पतीविरूध्द गुन्हा


भुसावळ : पत्नीशी अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुक्ताईनगर पोलिस ठाण्यातून बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पती-पत्नी हे भुसावळ शहरातील रहिवासी आहे. शहरातील रहिवासी असलेले पती-पत्नी यांचा विवाह झाल्यानंतर 21 जून 2018 ते 8 नोव्हेंबर 2018 या काळात पतीने पत्नीस औरंगाबाद, अजमेर, बर्‍हाणपूर आदी ठिकाणी नेत लॉजवर पत्नीच्या इच्छेविरुद्ध कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडीत पत्नीने मुक्ताईनगर न्यायालयात पती विरूध्द खटला दाखल केल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत हा गुन्हा कलम 156 (3) नुसार 14 ऑगसट 2020 या दिवशी दाखल करण्याचे आदेश दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला मात्र गुन्ह्याचे प्राथमिक घटनास्थळ हे भुसावळ येथील असल्याने गुन्ह्याचे मुळ कागदपत्रे ही पुढील तपासासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहेत. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, किशोर महाजन पुढील तपास करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !