देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत भुसावळ 46 व्या स्थानी


मुंबई : केंद्र सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 चा गुरुवारी निकाल जाहीर झाला असून त्यात सलग चौथ्यांचा इंदौर देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलं आहे. गुजरातमधील सुरत दुसर्‍या क्रमांकावर तर तिसर्‍या क्रमांकावर नवी मुंबई आहे. दरम्यान, भुसावळ शहर देशात 46 व्या स्थानी तर महाराष्ट्रात 14 व्या स्थानावर असून खान्देशातील धुळ्याने मात्र नवव्या स्थानावर मुसंडी मारली आहे.

भुसावळच्या मानांकनात वाढ
दोन वर्षांपूर्वी भुसावळने अस्वच्छतेबाबत क्रमांक पटकावल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली होती मात्र नंतर व्यापक उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या तर गत वर्षापेक्षाही यंदा भुसावळ पालिकेने आपल्या मानांकनात वाढ केली आहे तर जळगावची मात्र घसरण झाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !