रावेरची शांतता अबाधीत राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करा


अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके : रावेरात शांतता समितीची बैठक

रावेर : मोहरम आणि गणेश उत्सवासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मोहरम आणि गणेशोत्सव शासनाने घालुन दिलेल्या नियमा प्रमाणे साध्या पध्दतीने साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे तसेच रावेर शहरात शांतता अबाधीत राहण्यासाठी नागरीकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी रावेरात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले. मराठा मंगल कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी गणेशोत्सव व मोहरम यांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक झाली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलिस पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, तहसीलदार उषाराणी देवगुणे, नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मेहमूद शेख, भास्कर महाजन, अशोक शिंदे, दिलीप कांबळे, बाळु शिरतूरे, गयास शेख, यूसुफ खान, सादिक शेख, असदुल्ला खा, हरीष गनवाणी, पिंटू महाजन, अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे, नितीन पाटील, मोहरम व गणेश मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

सोशल डिस्टन्स पाळून उत्सव साजेर करा : नरेंद्र पिंगळे
आगामी सण व उत्सव कोरोना काळात सोशल डिस्टन्सचे पालन करून घरातल्या घरात साजरे करावे तसेच कायदा-सुव्यस्थेचे सुध्दा पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !