कोरोनावरील साहित्याचा जगभरात होतोय अभ्यास


डॉ.आनंद त्रिपाठी : भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात चर्चासत्र

भुसावळ : दि भुसावळ पिपल्स चॅरीटेबल संस्थेच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 17 ते 21 ऑगस्ट पाच दिवसीय आंतर शाखीय चर्चासत्र सुरू असून तिसर्‍या दिवशी प्रथम सत्रात सागर विद्यापीठमधील हिंदी व संस्कृत विभाग प्रमुख डॉ.आंनद त्रिपाठी यांनी कोविडं 19 व हिंदी साहित्य, सोशल मीडिया विषयावर मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या काळात हिंदी साहित्या वर लेखन झाले असून कोरोनावरील कविता, पुस्तके लिहिली जात असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ती जगभर वाचली जात आहेत. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

कोरोनात ऑफलाईन अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य
अमरावती विद्यापीठातील शिक्षण विभाग प्रमुख डॉ.गजानन गुलहाने यांनी ऑनलाईन अध्यापन पध्दतीवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कोरोना काळात ऑफ लाईन अभ्यासक्रम पूर्ण करने शक्य नाही त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून शिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध पध्दती आहेत. व्हर्चुअल क्लासरूम, झूम, गुगल मीट, गुगल अकाऊंट, मूक, स्वयंम आदी पाठशाळा आदींद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन घरी बसून शिकविता येते व अभ्यासक्रम पूर्ण करता येतो. सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील डॉ.वैभव जाधव यांनी कोविडं 19 व शिक्षणातील टेक्नॉलॉजी या विषयावर बोलताना सांगितले की, कोरोना काळात बर्‍याच शैक्षणिक संस्था या ठप्प झाल्या असून त्यासाठी त्यांनी उच्च शिक्षणासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून शिकविणे सुरू केला आहे. ग्रामीण व शहरी भागात शक्य तो यूजर फ्रेंडली माध्यमातून शिकविले जात आहे.

लॉकडाऊनमुळे जनजीवनावर परीणाम
दुपार सत्रात नाशिक येथील प्राचार्य डॉ.चंद्रकांत बोरसे यांनी कोविडं 19 चा भारतीय संस्कृतीवर परीणाम या विषयावर बोलताना सांगितले की, कोरोनामुळे भारतीय संस्कृतीवर खूप फरक पडला असून सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा, मार्केट, मॉल, थिएटर, कंपनी, दळणवळण साधने तसेच राष्ट्रीय सामाजिक स्तरावर प्रभाव पडला. साऊथ आफ्रिका या देशातील लेसोथो, बेरीया तेयतेयने नग येथील पँटसो कान* यांनी जीवन, प्रश्न, समीकरणे आणि भाग्य: निवडलेल्या मजकूरावर उजळणी या विषयावर बोलताना सांगितले की, कोविड 19 महामारी दरम्यान मानवी जीवनातील समानता आणि सॅम्युअल बेकेटच्या अस्तित्त्वात असलेल्या नाटक वेटिंग फॉर गोडोट’ (1952) मधील पात्रांच्या जीवनाबद्दल आहे. तेथील नायक आशेचे मूर्तिमंत गोडोट यांची वाट पाहत आहेत तर आम्ही संकटाच्या या काळात मानव म्हणून लसची वाट पाहत आहोत. सकाळ सत्रात सुप्रीयो हलदर, वेस्ट बंगाल, डॉ बाबूबक्ष मंसुरी, पी.चंद्रिका, हैद्राबाद, सुषमा रावत, डॉ.गायत्री चॉकडे, पुणे, सुरेखा मंत्री, ऋतुप्रिया भांजा, हावडा, डॉ.जयश्री सरोदे भुसावळ, डॉ.संजय मांडवकर, सुभाष आठवले यांनी संशोधन पेपर सादर केलीत.

यांनी घेतले परीश्रम
शैक्षणिक विभाग यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या संचालक चेअरपर्सन प्रा.डॉ.कविता साळुंके, प्राचार्य डॉ.मीना कुटे, मुंबई, यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा.अंजली पाटील तर आभार प्रा.डॉ.जे.बी बागुल यांनी मानले. या चर्चासत्रासाठी प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, करण नाईक, ज्योती लष्करी व सर्व आयोजन समिती सदस्य परीश्रम घेत असल्याचे चर्चासत्राचे चेअरमन प्राचार्य डॉ.आर.पी.फालक व आयोजन सचिव व प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आह




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !