कोल्हापूर-दौंड-मनमाड किसान पार्सल विशेष रेल्वे धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेतर्फे कोल्हापूर-दौंड-मनमाड दरम्यान विशेष किसान पार्सल ट्रेन चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 00107/00108 देवळाली ते मुजफ्फरपुर-देवळाली किसान पार्सल गाडी चालवण्यात येणार आहे. डाऊन 00109 कोल्हापूर-मनमाड लिंक विशेष किसान पार्सल गाडी कोल्हापूरहुन 21 ऑगस्ट ते 25 सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 6.25 वाजता मनमाड येथे पोहोचणार आहे. अप 00110 मनमाड-कोल्हापूर लिंक विशेष किसान पार्सल गाडी मनमाड येथून 24 ऑगस्अ ते 28 सप्टेंबरदरम्यान दर सोमवारी आठ वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी कोल्हापूरला 8.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्दुवाडी, दौंड, अहमदनगर आणि मनमाड नंतर देवळाली मुजफ्फरपुर असा थांबा देण्यात आला आहे. या गाडीला कोल्हापूरहून पाच व्हीपीयू आणि एक लगेज कम गार्ड ब्रेक आणि दौंडहुन दोन व्हीपीयू कोच लावण्यात येणार असून , ही सर्व व्हीपीयू गाड़ी क्रमांक 00107/00108 देवळाली -ते मुजफ्फरपुर- देवळाली किसान पार्सल गाड़ीला मनमाड येथे जोडली जाईल व काढली जाईल. शेतकर्‍यांसह कार्गो अ‍ॅग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांनी आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !