यावल पालिकेकडून मोकाट गुरांवर कारवाई
बेवारस गुरांमुळे वाहनधारकांसह नागरीकांना मोठा मनस्ताप
यावल : शहरातील मोकाट फिरणार्या गुरा-ढोरांमुळे वाहन चालकांपासुन तर नागरीकांना मोठा मनस्ताप होत असल्याने शहरवासीयांसाठी डोकेदुखी ठरणारी बेवारस गुरेढोरे पकडण्याच्या मोहिमेस नगर परिषदने सुरूवात केल्याने समाधान व्यक्त होत आहे. यावल नगर परीरषदेच्या सभागृहात अनेक सर्वसाधारण सभेत वारंवार या मुकाट फिरणार्या जनावरांचा प्रश्न नेहमीच चर्चेला येत असलातरी नगरपरीषद प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची यावलकरांची ओरड होती. मागील काही दिवसांपासून या विषयी प्रसार माध्यमांतून अनेक वेळा वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आले होती. अखेर नागरीकांच्या व वाहनधारकांच्या प्रश्नाकडे नगरपरीषद प्रशासनाला लक्ष घातले आहे. यावल शहरातील प्रमुख बुरूज चौक, भुसावळ टी पॉईंट, बसस्थानक परीसर, जुना भाजीबाजार चौक, आठवडे बाजार परीसर अशा नागरी वर्दळीच्या मार्गावर नियमीत मोकाट फिरणार्या जनावरांमुळे रहदारीसमोठी अडचण व समस्या निर्माण होत असे. यावल नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभागप्रमुख रमाकांत मोरे, स्वच्छता विभागप्रमुख शिवानंद कानडे आदी कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरीषदेने यावल शहरात फिरणारी मोकाट गुरे-ढोरे जमा करण्याची मोहिमेला सुरूवात केली आहे.

