दलित सरपंचांच्या हत्येचा अ.भा.काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे निषेध


भुसावळ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील अनु.जाती प्रवर्गातील सुमारे दोन हजार 484 विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप रद्द करून त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवून प्रवेश नाकारण्यात आल्याचा तसेच उत्तर प्रदेशातील बांसा, जि.आझमगढ येथील सत्यमेव जयते या दलित सरपंचाची दिवसा-ढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाद्वारे निषेध करण्यात आला. या घटनेची दखल घेत अखिल भारतीय काँग्रेस अनु.जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत हे त्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जात असतांना त्यांना तेथील पोलिस प्रशासनाकडून आझमगढ जिल्ह्याच्या सीमेवर अडवून ताब्यात घेण्यात आल्याने उत्तर प्रदेशातील योगी सरकारचा निषेध करण्या आला. या संदर्भात भुसावळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
तहसीलदारांना निवेदन देताना जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी,
ईस्माईल गवळी, गफूर गवळी, अ‍ॅड.शरद तायडे, अ‍ॅड.रम्मू पटेल उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !