भुसावळात व्यापार्यांची अँटीजन रॅपीड टेस्ट
भुसावळ : शहरातील म्युनीसीपल हायस्कूल व सनराइज हॉस्पीटलमध्ये 577 दुकानदार, व्यवसायीकांची अटीजन रॅपीड टेस्ट झाली. यात नऊ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले तर सुमारे 109 जणांना नोंदणीनंतरही किटचा तुटवडा निर्माण झाल्याने चाचणी करता आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. व्यापारी, दुकानदार व विक्रेत्यांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली असून शनिवारी तिसर्या दिवशी तपासणी करण्यात आली. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी शहरातील दुकानदारांसह हॉकर्स व इतर विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रांताधिकार्यांनी याबाबत आदेश काढल्यानंतर दुकानदारांनी चांगला प्रतिसाद देत चाचणीसाठी पुढाकार घेतला. मात्र सध्या यंत्रणा तोकडी पडत आहे. मेडीकल स्टोअर्स दुकानदारांचे सनराईज हॉस्पीटलमध्ये स्वॅब घेण्यात आले तर इतर उर्वरित दुकानदारांची अॅटीजन टेस्ट घेण्यात आली. 577 जणांचे स्वॅब घेतले त्यातून 9 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. 568 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र स्वॅब देण्यासाठी आलेल्या 109 जणांना परत माघारी फिरावे लागले. प्रशासनाकडे योग्य व्यवस्थापन नसल्याने म्युनीसीपल हायस्कूलच्या शिबिरात गर्दी होत आहे. मात्र नियमीत वेळेत हे शिबिर सुरु होत नाही.

