भुसावळात परप्रांतीयाला मारहाण करून लुटणारे आरोपी जाळ्यात
भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : मोबाईल जप्त
भुसावळ : वैतागवाडीत तक्रारदार आल्याचे सांगत त्यास तिघांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत त्याच्या खिशातील दहा हजारांच्या रोकडसह मोबाई लांबवलची घटना 21 रोजी दुपारी साडेचार वाजता नाहाटा कॉलेजच्या पुढे असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिघा आरोपींच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, आरोपींची अद्याप ओळख परेड बाकी असल्याने पोलिसांनी त्यांची नावे जाहीर केलेली नाही.
मारहाण करून लुटले
तक्रारदार मेहेरबानसिंग जयसिंग नायक (40, रा.शिरपूर तलाव, धार रोड इंदौर, मध्य प्रदेश) हे वाहनात डिझेल भरण्यासाठी जात असताना 18 ते 20 वयोगटातील तीन संशयीतांनी त्यांना धमकावत तू वैतागवाडी आला होता, तुझे येथे काय काम, असे सांगत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करीत धमकावून खिशातील 10 हजारांची रोकड तसेच 500 रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. तक्रारदाराने याबाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
गुन्हा घडल्यानंतर पसार झालेले आरोपी शनिवारी रात्री साडेनऊ वाजता जामनेर रोडवरील हॉटेल हेवन मागील शाह गल्लीत आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्ष पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहा.फाजदार सुनील सोनवणे, नाईक रवींद्र बिर्हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकरद्य महेश चौधरी, कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, गजानन वाघ आदींनी केली. अधिक तपास सहा.फौजदार सुनील सोनवणे करीत आहेत.

