वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्रींची विधीवत स्थापना
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या संपर्क कार्यालयात पर्यावरण पूरक तुरटीच्या श्री गणपती बापांच्ची स्थापना विधीवत करण्यात आली. प्रसंगी सुनील काळे व सौ.रूपाली सुनील काळे यांनी वरणगाव शहरातील 50 हजार जनतेला सुखी आणि आनंदी ठेवण्यासह भरभराटी मिळण्यासाठी तसेच शहर कोरोनामुक्त होण्यासाठी गणरायाला साकडे घातले. तुरटीचा गणपती बसवण्यामागे पर्यावरणाचा समतोल साधला जाण्यासाठी स्थापना करीत असल्याचे सुनील काळे यावेळी म्हणाले. यावेळी मंत्रोच्चरात जयघोष करण्यात आला. यावेळी विशाल महाराज किशोर, सोनार मेजर, संजय सोनार, हितेश चौधरी, नरेंद्र बावणे, अमन चंदले, बंटी सोनार, संजय बेदरकर, कमलाकर मराठे, छोटू सेवातकार, रोहित माळी, तेजस चौधरी, प्रशांत बावणे, विक्की चांदेलकर, विवेक कुलकर्णी, राहुल जंजाळे, आकाश कोळी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

