किसान रेल्वे पार्सल गाडी आता आठवड्यातून दोन दिवस धावणार
भुसावळ : शेतकर्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी 25 ऑगस्टपासून दर मंगळवारी आणि शुक्रवारी किसान रेल पार्सल गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत-जास्त प्रमाणात माल पाठविता येणार आहे.
पार्सल पर्यवेक्षकांशी संपर्क साधण्याचे आवाहन
00107 डाउन देवळाली ते मुजफ्फरपुर किसान पार्सल गाडी ही प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी देवळाली स्टेशनहुन सहा वाजता सुटल्यानंतर गुरुवारी आणि रविवारी पहाटे 03.55 वाजता मुजफ्फरपुर स्टेशनवर पोहोचणार आहे. ही गाडी नाशिक रोडला 6.10, मनमाड-7.30, जळगाव 9.55, भुसावळ 10.45, बुधवार आणि शनिवारी बर्हाणपूरला रात्री 12.5, खंडवा 02.10 पोहोचेल शिवाय या गाडीला इटारसी, पिपरीया, गाडरवारा, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापुर या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. गाडी क्रमांक 00108 अप मुजफ्फरपुर ते देवळाली ही गाडी प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी आठ वाजता सुटल्यानंतर शुक्रवारी आणि सोमवारी 5.45 वाजता देवळालीला पोहोचल. ही गाडी शुक्रवारी आणि सोमवारी खंडवा येथे 09.55, बर्हाणपूरल 11.35, भुसावळ 12.50, जळगाव 1.40, मनमाड 3.50, नाशिक 5.15 ला पोहोचेल. दरम्यान, शेतकर्यांना त्यांचा माल पॅक करून हा आपल्या जवळपासच्या पार्सल ऑफिसमध्ये आणावा लागेल सोबत आधार कार्डची झेरॉक्स ठेवावी लागेल. शेतकरी, कार्गो अॅग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क करावा लागेल. शेतकर्यांनी जास्तीत जास्त संख्येने या गाडीने माल वाहतूक करावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


