कोल्हापूर-दौंड-मनमाड किसान पार्सल रेल्वे सांगोल्याहून धावणार


भुसावळ : शेतकर्‍यांच्या मागणीनुसार व सोयीसाठी मंगळवार, 25 ऑगस्टपासून दर शुक्रवारी व मंगळवारी किसान रेल्वे पार्सल गाडी ही चालवली जाणार आहे. शेतकरी, व्यापारी, बाजार समिती, लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत-जास्त प्रमाणात माल पाठविता येणार असून आता ही गाडी सांगोला रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे. डाऊन 00109 कोल्हापूर-मनमाड लिंक विशेष किसान पार्सल गाडी सांगोला येथून दर मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी आठ वाजता सुटेल व त्याचदिवशी 6.30 वाजता मनमाडला पोहोचेल. अप 00110 मनमाड-दौंड लिंक विशेष किसान पार्सल गाडी मनमाडहून प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी आठ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी दौंडला 12.20 वाजता पोहोचेल.

या ठिकाणी गाडीला थांबा
या गाडीला पंढरपूर, कुर्दुवाडी, दौंड, बेलवडी, अहमदनगर, बेलापूर, कोपरगांव आणि मनमाड नंतर देवळाली मुजफ्फरपूर असा थांबा देण्यात आला आहे..या गाडीला सांगोलाहुन 10 व्हीपीयू आणि 1 लगेज कम गार्ड ब्रेक, आणि दौंडहुन दोन व्हीपीयू कोच असतील. गाडी क्रमांक 00107/00108 देवळाली ते मुजफ्फरपुर-देवळाली किसान पार्सल गाडी मनमाड येथे जोडली जाईल व काढली जाईल. ज्या शेतकरी, कार्गो अ‍ॅग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना माल पाठवायचा असेल त्यांना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. अधिकाधिक शेतकर्‍यांनी या गाडीच्या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !