आंबेडकरी चळवळीचे आ.बा.निकम पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन


कवी अनिल इंगळे लिखीत पुस्तक : आतापर्यंत 41 पुस्तकांचे प्रकाशन

भुसावळ : भुसावळातील कवी, लेखक अनिल इंगळे यांच्या आंबेडकरी चळवळीचे आ.बा.निकम या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले. नायब तहसीलदार प्रकाश इंगळे यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आनंदा सोनवणे, महेश सपकाळे, नगरपालिकेचे सुनील इंगळे, विशाल पाटील, अनिल टापरे, जुडो नाटकर, निलेश पाटील, सागर बहिरुणे, अण्णाभाऊ नरवाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिव्हील इंजि.निलेश पाटील यांनी केले.

अनेकांनी दिल्या शुभेच्छा
इंगळे यांच्या पुस्तकाला रीपाइं नेते रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव, रवींद्रनाथ तायडे, शरद सोनवणे, दादा निकम, भगवान निरभवणे, सुनील अंभोरे, प्रा.संदानशीवे, प्रा.उत्तम सुरवाडे, डॉ.प्रदीप नाईक, डॉ.निलेश महाजन, डॉ.नितीन दावलभक्त, अ‍ॅड.मतीन अहमद, अ‍ॅड.जगदीश कापडे, अ‍ॅड.सुनील पगारे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अनिल इंगळे यांनी लिहिली 41 पुस्तके
महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचे केंद्रीय अध्यक्ष व रीपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल इंगळे यांनी या पुस्तकाला आकार दिला असून त्यांची आतापर्यंत 41 पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !