आयशर वाहनाच्या अपघातात गुरांची वाहतूक उघड


पोलिसांनी गुरांची केली गो शाळेत रवानगी : अपघातग्रस्त वाहन जप्त

फैजपूर : भुसावळ रोडवरील आमोदा-बामणोद गावाजवळ शनिवारी आयशर गाडीचा अपघात झाल्याची घटना पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र या अपघातग्रस्त वाहनात चक्क गुरांची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेऊन गुरांना गोशाळेत रवाना केले. सहा लाखांचे वाहन व त्यात दीड लाखाचे गुरे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर उघड झाले बिंग
आमोदा-बामणोद गावाच्या दरम्यान आयशर गाडी क्रमांक आर.जे.14 जी.ई.84 66 या वाहनाचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले मात्र या अपघातग्रस्त वाहनाची पाहणी करीत असताना त्यामध्ये गुरे असल्याची बाब उघड झाली. पोलिसांनी या संदर्भात अधिक चौकशी केली असता या गुरांची तोंड व पाय बांधून विना परमिट व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमाणपत्राशिवाय अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सहा लाखांचे अपघातग्रस्त वाहन तसेच दीड लाखाचे 9 गुरे व त्यात तीन वासरे असल्याचे पोलिसांनी सांगत गुरांची गोशाळेत रवानगी केली. घटनास्थळी डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी भेट दिली. या संदर्भात पोलिस कॉन्स्टेबल किरण चाटे यांच्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याचे सांगण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !