भुसावळातील नगरसेवकाला लुटणारा आरोपी आरोपी जाळ्यात


बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या

भुसावळ : नगरसेवकाला शिवीगाळ करीत त्यांच्या खिशातील पाच हजार 700 रुपये लांबवण्यात आल्याची घटना 21 जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर आरोपी गुन्हा घडल्यानंतर पसार झाला होता. आरोपी नाहाटा चौफुली परीसरात आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (29, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून अटक
नगरसेवक किरण कोलते (रा.प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) यांना 23 जानेवारी रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास आरोपीने मुन्ना चौधरीने शिवीगाळ केली होती शिवाय त्यांच्या खिशातील पाच हजार 700 रुपये हिसकावून पळ काढल्याने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सात महिन्यांपासून पसार आरोपी शहरातील नाहाटा चौफुली परीसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार सुनील जोशी, नाईक रमण सुरळकर, रवींद्र बिर्‍हाडे, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !