मनूर बुद्रुक येथे तरुणाची आत्महत्या


बोदवड : तालुक्यातील मनूर बुद्रुक येथील विशाल परशुराम शेळके (21) या तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी येवती शिवारात घडली. बोदवड ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी संजय तुकाराम शेळके यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस उद्दल चव्हाण करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !