जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 605 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 22 हजार 923 वर : 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी तब्बल 605 कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ उडाली असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 22 हजार 923 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 737 झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात 15 हजार 982 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 118
जळगाव ग्रामीण 54
भुसावळ 46
अमळनेर 19
चोपडा 50
पाचोरा 23
भडगाव 01
धरणगाव 16
यावल 29
एरंडोल 53
जामनेर 06
रावेर 09
पारोळा 14
चाळीसगाव 30
मुक्ताईनगर 129
बोदवड 04
अन्य जिल्हा 04


