केळीवर व्हायरस : आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेताच्या बांधावर जावून केली पाहणी
मुक्ताईनगर : तालुक्यातील केळी पीकावर सी.एम.व्ही. कुकुंबर मोझॅक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकर्यांवर केळी उपटून फेकण्याची वेळ आल्याने नुकसानग्रस्त शेतांची आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचार्यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. तालुक्यातील खामखेडा, सुकळी, उचंदा, शेमळदे, मेळसांगवे आदी परीसरातील नुकसानग्रस्त केळी बागांची पाहणी करण्यात आली. यावेळी तत्काळ नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश करून शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना आमदारांनी केल्या. आमदार पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे व जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्याशी या संदर्भात भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. जैन आणि मध्यप्रदेशातील रेवा या टिश्यूकल्चर कंपनी कडून शेतकर्यांना नुकसान भरपाई होणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी गोपाळ सोनवणे, दिलीप चोपडे, महेंद्र मोंढाळे, स्वीय सहायक प्रवीण चौधरी, संतोष कोळी, पत्रकार छबीलदास पाटील, डिगंबर पाटील (सुकळी), साहेबराव पाटील (खामखेडा), डी.बी.पाटील (शेमळदा), धोंडू पाटील, गोकुळ पाटील, विजय पाटील यांच्यासह पदाधिकारी व केळी उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होतेण


