भुसावळात एकावर प्राणघातक हल्ला : तिघा आरोपींना अटक


भुसावळातील मणियार हॉलजवळ किरकोळ कारणावरून घटली होती घटना : हल्ल्यासाठी चाकूसह लोखंडी पाईपाचा वापर

भुसावळ : शहरातील मणियार हॉलजवळ किरकोळ कारणावरून वाद उफाळल्याने आरोपींनी चाकूसह लोखंडी रॉडने हल्ला केला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी पसार झाले होते. आरोपी खडका रोड परीसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शेख नईम शेख जेनुद्दीन (40), शेख मोहिन शेख सेफउद्दीन (20)व शेख मुस्तफा शेख सैफुद्दीन (19, सर्व रा.मणियार हॉलजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

किरकोळ कारणावरून उफाळला होता वाद
संशयीत आरोपींनी तक्रारदार शेख नाजीश शेख निसार (रा.मणियार हॉलजवळ, भुसावळ) यांच्या घरासमोरील ड्रेनेज लाईनमध्ये विटा टाकल्याने ती जाम झाल्याने तक्रारदाराच्या आई यांनी याबाबत संशयीतांना विचारपूस केल्यानंतर आरोपींनी गर्दी जमवून फिर्यादीस लोखंडी रॉडने व चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी 16 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयीत आरोपी खडका चौफुली परीसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, नाईक किशोर महाजन, रवींद्र बिर्‍हाडे, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, कृष्णा देखमुख, प्रशांत परदेशी आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !