दुचाकी चोरटा वरणगाव पोलिसांच्या जाळ्यात


नांदूर्‍याहून लांबवली दुचाकी : नांदुरा पोलिसांच्या माहितीनंतर कारवाई

वरणगाव : नांदूरा येथून दुचाकी लांबवणार्‍या चोरट्याच्या वरणगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शैलैश बाळू चिखलकर (20, निमखेडी (सातोड), ता. मुक्ताईनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. नांदुरा येथील सुरेश रामचंदानी (59, मिहानी चौक, मेन रोड, नांदूरा) घराबाहेर लावलेली दुचाकी (एम.एच.28 ए.एफ. 487) चोरीला गेल्याप्रकरणी नांदुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. चोरट्याबाबत नांदूरा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनीवरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या संपर्क साधल्यानंतर एएसआय नरसिंग चव्हाण, योगेश जोशी, पराग दुसाने आदींनी हतनूर येथून आरोपीला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून दुचाकी जप्त करण्यातआली असून त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपीचा नांदूरा पोलिसांनी ताबा घेतला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !