वरणगावात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च
वरणगाव : आगामी सण-उत्सव व सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरणगाव पोलिस स्टेशनच्या कर्मचार्यांसह रॅपीड अॅक्शन फोसच्या जवानांनी शहरातून रूट मार्च केला. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी वरणगाव शहरातील बसस्थानक चौक, भोगावती नदी, मोठी होळी, चौधरी वाडा, गांधी चौक, लोहार गल्ली, मार्गे पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये या रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्च दरम्यान मुख्य मार्गाने सोशल डिस्टन्सचे पालन ककरण्यात आले. रूट मार्च वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हर्षल भोये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला व त्यात वरणगाव पोलिस ठाण्याचे 20 कर्मचारी, 30 होमगार्ड व रॅपीड अॅक्शन फोर्सचे 70 कर्मचारी सहभागी झाले.

