अंतर्नादचे उपक्रम कायमच पथदर्शी : हिरालाल चौधरी
अंतर्नाद आणि उषा फाऊंडेशन तर्फे कोसगाव शाळेत 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
भुुसावळ : भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान आणि उषा फाऊंडेशनतर्फे एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबवला जात आहे. त्यात मंगळवारी यावल तालुक्यातील कोसगाव येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेेत 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी यावल पंचायत समिती माजी सभापती हिरालाल चौधरी होते. सरपंच सुनील सपकाळे, उपसरपंच विजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोपान पाटील,
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप मोवे, हभप अनिल पाटील महाराज, अविनाश तायडे, पांडुरंग महाजन, मुख्याध्यापक किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अंतर्नादची माहिती अध्यक्ष संदिप पाटील यांनी तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख अमितकुमार पाटील, आभार समन्वयक निवृत्ती पाटील तर सूत्रसंचलन जीवन महाजन यांनी केले. सह समन्वयक भूषण झोपे, योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, सौरभ जावळे, महेश पाटील यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गरजू 40 विद्यार्थ्यांना पाट्या, पेन्सील, वह्या, पेन, पेंसील, खोडरबर, स्केल असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

उपक्रम कौतुकास्पद : हिरालाल चौधरी
गणेशोत्सवात खर्चात बचत करून त्यातून घेतलेले शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल. अंतर्नादचे सर्वच उपक्रम सामाजिक बांधीलकी जोपासून राबविले जातात त्यामुळे अंतर्नादचे काम नक्कीच सर्वांन साठी पथदर्शी आहे, अशी भावना पंचायत समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केली.
उपक्रमाचे यंदा चवथे वर्ष
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून गणेशोत्सवाला या सामाजिक उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. यावेळी नव्यानेच या उपक्रमासोबत उषा फाउंडेशनही जुळली आहे.अंतर्नादचे सदस्य हे स्वत: आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. यंदा चवथे वर्ष आहे.
दरवर्षी नवीन शाळांची निवड
उपक्रमांतर्गत दरवर्षी ग्रामीण भागातील नवीन शाळांची निवड केली जाते. यंदा बामणोद येथील उर्दू शाळेपासून सुरुवात करण्यात आली आहे. आणखी तीन शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती उषा फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप जावळे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली.

