भुसावळात इलेक्ट्रॉनिक्स दुकान फोडले : आरोपी जाळ्यात
भुसावळ : शहरातील मॉडर्न रोडवरील हरी ओम इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 17 रोजी चोरट्यांनी दोन लाख 26 हजार 350 रुपयांचा सामान लांबवला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरी प्रकरणी पसार असलेला आरोपी इम्रान उर्फ इम्मू शेख नजीर शेख (28, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यास मंगळवारी जाम मोहल्ला परीसरातून गोपनीय माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक किशोर महाजन,रमण सुरळकर, रवींद्र बिर्हाडे, उमाकांत पाटील, महेश चौधरी, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींनी केली.

