भुसावळात गावठी पिस्टल एअरगनसह आरोपी जाळ्यात


भुसावळ बाजारपेठ पोलिसांची गोपनीय माहितीवरून कारवाई

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गावठी पिस्टल, एअरगन व चाकू बाळगणार्‍यास सोमवारी सायंकाळी सात वाजता अटक केली. सागर योगेश वाघ (22, रा.सुतार गल्ली, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी सोबत एक विधीसंघर्ष बालकही आढळला आहे. आरोपींच्या ताब्यातून 20 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, पाच हजारांची एअरगन व पाचशे रुपये किंमतीचा चाकू जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, बाबासाहेब ठोबे, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, नाईक किशोर महाजन, रमण सुरळकर, समाधान पाटील, रवींद्र बिर्‍हाडे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !