ठेवीदाराच्या ठेव वसुली प्रकरणी रायसोनी पतसंस्थेची मालमत्ता जप्तीचे आदेश


भुसावळ : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप. क्रेडीट सोसायटी या पतसंस्थेत जामनेर येथील रहिवाशी ईश्वर तेली, प्रकाश मोतीलाल सरताळे व शैलेश प्रकाश सरताळे यांनी मुदत ठेव रक्कम जमा केली होती. सदर ठेवीची रक्कम परत न मिळाल्याने या ठेवीदारांनी जळगांव येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक तक्रार क्रं.241 व 242/ 2017 ग्राहक सरंणक्ष कायदा 1986कलम 12 अन्वये दोन वेगवेगळया केसेस दाखल केल्या होत्या. सदर तक्रार अंशत: मंजूर झाली असून ग्राहक मंचाने निवाडा पारीत केला आहे. या निवाड्याप्रमाणे रक्कम वसुलीसाठी उपरोक्त ठेवीदारांनी ग्राहक मंचासमोर ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 अन्वये वसुली अर्ज क्र.03/2019 व 04/2019 दाखल केले होते. ग्राहक मंचाने सदर वसुली अर्जात वसुली प्रमाण पत्र पारीत करुन जिल्हाधिकारी जळगाव यांना रक्कम वसुलीबाबत आदेश दिले. ही संस्था अवसायनात आहे. या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जळगांव यांनी सदरील रक्कम वरील संस्था व अवसायकाकडून महसूल अधिनियम 1967 कलम 17 अन्वये28 नोव्हेंबर 2019 रोजी तहसीलदार यांना आदेश करीत रक्कम वसुलीबाबत आदेश पारीत केले आहेत.

आदेशाने उडाली खळबळ
या आदेशान्वये तहसीलदार, जळगांव यांनी वरील संस्थेचा जळगांव येथील निमखेडी शिवार गट नं.118/3/प्लॉट/33 मधील क्षेत्र आर.चौ.मी.645.12 जमीन महसूलाची थकबाकी म्हणून तीन लाख 38 हजार 697 रु. अधिक एक लाख 62 हजार 275 रुये 17 नोव्हेंबर 2018 पासून द.सा.द. शे. 9 टक्के व्याज इतकी रक्कम देण्यास कसूर केल्याने तहसीलदार जळगाव यांच्या कार्यालयाचे पुढील आदेशापर्यंत त्या मालमत्तेची विक्री, देणगी हस्तांतरण करण्यास मनाई केली आहे व वरील मिळकतीच्या सातबारा उतार्‍यावर इतर हक्कात नाव दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. असा स्थावर मालमत्तेच्या जप्तीचा आदेश नियम 11 नमुना 4 अन्वये क्रं.आर.आर.सी/करतस/12/20 तहसीलदार यांचे कार्यालय, जळगाव 17 ऑगस्ट 2020 रोजी आदेश देऊन तलाठी पिंप्राळा यांना मंडळ अधिकारी, जळगांव यांनी सदरच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आदेशाची नोंद घेऊन उपरोक्त गटाचे सातबारावर सरकार नाव दाखल करुन दुरुस्त उतारा तहसील कार्यालय, जळगांव येथे तात्काळ सादर करावा, असा आदेश पारीत केला. आहे. ठेवीदारांतर्फे भुसावळ येथील अ‍ॅड.राजेश एस.उपाध्याय, भुसावळ यांनी काम पहिले व त्यांना अ‍ॅड.जितेंद्र भतोडे, अ‍ॅड.कैलाश शेळके व अ‍ॅड.विनोद तायडे यांनी सहकार्य केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !