महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मोहसीन काझी


भुसावळ : भुसावळातील मोहम्मदीया नगरातील रहिवासी मोहसीन शरीफ काझी यांची महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी केली आहे. मोहसीन हा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार शरीफ काझी यांचा चिरंजीव आहे. मोहसीन काझी यांच्या निवडीबद्दल जिल्हा पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी व विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !