रेल्वे कर्मचार्याचा मृत्यू : वारसांना एकाच दिवसात पेन्शनसह दिले इतर सर्व लाभ
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ट्रॅकमनचे कोरोनामुळे 28 रोजी निधन झाले होते. मृत्यू पश्चात त्यांचे मृत्यूपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे 2 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या वारसदाराला कार्मिक विभागाच्या वतीने पी.एफ.आणि इतर सर्व रक्कम प्रदान करण्यात आली आणि तसेच पेंशन देखील त्याच दिवसापासून लागू करण्यात आली. याकामी कल्याण निरीक्षक श्रीकांत सूर्यवंशी यांनी विशेष मेहनत घेतली तसेच या कामासाठी त्यांना कार्मिक आणि लेखा विभागातील सर्व कर्मचार्यांचे सहकार्य मिळाले. सिनी डीपीओ एन.डी.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्मिक शाखेच्या कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.

